Wednesday, 30 December 2020

कथा :- नकळत सारे घडले -4

कथा :- नकळत सारे घडले -4


 

 

 भावनाच्या डोळ्यांमध्ये आलेले पाणी सागर ने अलगद पुसले. आणि तिला समजावले अग... आज ना उद्या मला जावेच लागणार ना.. नको रडूस ☺️ आजचा दिवस आपण खूप छान घालवला आहे. भावना त्याच्या समोर बसत ... मला तुला भेटता नाही येणार आता याच खूप.. वाईट वाटतंय रे.. माझ्या साठी हे खूपच त्रासदायक आहे रे... सागर तू उद्या जाणार आहेस तर हे हाल आहेत माझे, तू नसल्यावर तर कस होणार माझं काय माहीत?.. व्यक्त होत म्हणाली. अग भावना मला तरी कुठे हा दुरावा सहन होणार आहे का?, अग ते जाऊ देत, आपण एकमेकांशी कसे बोलणार?.. घरच्या फोन वर आपण बोलू नाही शकणार. मी एक करू शकतो, माझा मित्र आहे त्याचा फोन बूथ आहे, तिथून मी तुला फोन करत जाईन आणि नंतर मी पपांच्या मागे लागून फोन घेईन☺️.. मग काहीच अडचण नसेल. पण तू  कसे करणार आहेस? आणि तुला मी कसे कॉन्टॅक्ट करू?.. अग तू गप्प का? आहेस बोल ना काहीतरी. 



      तसे भावना म्हणाली अरे.. हो.. हो मी पण तोच विचार करतेय रे. .... अरे हा.... माझी मैत्रीण सायली आहे, तिचे आई वडील दोघे ही जॉब करतात त्यामुळे तू मला तिकडे फोन करू शकतोस कोणत्या वारी आणि किती वाजता फोन वर भेटायचे ते ठरव. मी बोलून घेईन तिच्याशी☺️. आमचे कॉलेज सुरू झाले की मग तू मला तिकडे बिनधास्त फोन करू शकशील. सागर ☺️ हसतच ठीक आहे असे म्हणाला. गप्पा सुरू असतानाच तिने सागर ची बहीण म्हणजेच तिची मैत्रीण शुभदा चा विषय काढला. अरे सागर शुभदा माझी सर्वात जवळची आणि खास मैत्रीण आहे रे.. आज पर्यंत आम्ही एकमेकां पासून काहीच लपवले नाही रे, मला आपल्या नात्या बद्दल तिला सांगावे लागेल. तिला दुसरीकडून कळले तर खूप नाराज होईल रे.. म्हणूनच मला असे वाटतेय की, तिला मी सांगावे समजून घेईल ती☺️, आणि आपल्याला सपोर्ट पण करेल. तुला काय वाटते रे सागर असे म्हणता सागर ने तिला आत्ताच नको सांगू काही दिवसांनी सांग असे भावनाला म्हणाला. तसे भावना ओके ठीक आहे म्हणत हसत ☺️ त्याच्या केसां मधून तिने हात फिरवला. गप्पांच्या ओघात संध्याकाळ होऊन गेलेली त्यांच्या लक्षात ही आले न्हवते. सागर ने तिला आज तू माझ्या बरोबर जेवशील का? असे विचारता भावनाने हसतच होकार दिला आणि जेवणाची फोन वरून ऑर्डर दिली. जेवण येईपर्यंत दोघे ही फ्रेश झाले. जेवण येताच दोघे ही जेवायला बसले, जेवण झाल्यावर भावनाने त्याला तू उद्याच निघणार आहेस ना? असे विचारले. सागर ने ही हो उद्याच निघायचे आहे. अरे हो पण आपण आपल्या फिरण्याच्या नादात रिझर्वेशन केलेचं नाही, एक काम करूयात उद्या सकाळी CST ला जाऊन मी रिझर्वेशन करते तुझं.. उद्या रात्रीच्या सह्याद्री चे चालेल ना? म्हणजे रात्रीच्या प्रवासामुळे तुला कंटाळा पण येणार नाही आणि सकाळी कोल्हापूर ला असशील. सागर ने ओके म्हणत आपण दोघे ही जाऊयात सकाळी लवकर असे म्हणाला. ठीक आहे,.. मग उद्या मी लवकरच येईन चल निघते मी आता,.. नाहीतर उशीर होईल असे म्हणत निघाली. 

      
      सागर ही तिला टॅक्सी पर्यँत सोडायला आला आणि टॅक्सीत बसवून सागर माघारी हॉटेल वर परतला. तिकडे भावना ही घरी पोहचली होती. फ्रेश होऊन आईशी जरा गप्पा मारून झोपायला गेली. इकडे सागर ला करमत ही न्हवते आणि वेळ ही जात न्हवता. टीव्ही सुरु करुन बघत बसला होता, बघता बघता कधी त्याची झोप लागली त्याला कळले ही न्हवते. सकाळी लवकरच सांगितल्या नुसार डोर कीपर ने बेल वाजवून त्याला उठवले, सागर ने ही त्याला थँक्स म्हणून ब्रश आणि अंघोळ करून सात वाजल्या पासून भावनाची वाट पाहत बसला होता. इकडे भावना ही सकाळी लवकर उठून तयार होऊन सागर कडे यायला निघाली होती, आईने विचारता अग... सायली बरोबर बाहेर जाणार आहे, आणि नाष्टा पण तिच्यासोबत करेन असे सांगून बाहेर पडली. टॅक्सी पकडून सागर कडे पोहचली. सागर रूम वर तयारच आहे पाहून अरे व्वा...  तयारपण झालास म्हणत एक छानशी स्माईल ☺️ देत गुड मॉर्निग स्वीट हार्ट म्हणाली. सागर ने ही हसतच ☺️ तिला गुड मॉर्निग माय हार्ट म्हणाला. ....

दोघांनी ही नाष्टा केला आणि रिझर्वेशन करिता बाहेर पडले. दादर हुन ट्रेन पकडून cst ला पोहचून सह्याद्री चे रिझर्वेशन करण्या करिता रांगेत उभे राहिले. त्यांच्या पुढे बरेचजण असल्याने बराच वेळ लागणार होता, तोपर्यन्त त्यांनी रिझर्वेशन फॉर्म भरून घेतला होता. नंबर येताच हव्या असलेल्या ट्रेन चे रिझर्वेशन मिळताच भावनाच्या चेहऱ्यावर समाधान होते. रिझर्वेशन झाल्या वर आता काय करायचे असा प्रश्न सागर ने भावनाला विचारला. भावना.. हो रे मी ही तोच विचार करतेय.. थांब जरा असे भावना म्हणाली. ती विचार करेपर्यंत सागर शांतपणे स्टेशन वरील वर्दळ न्याहाळत होता. तसेच होणाऱ्या ट्रेन च्या अनाऊन्समेन्ट नंतर ट्रेन करिता धावपळ करणाऱ्या लोकांकडे कुतूहलाने पाहत होता. 


      तेवढ्यात भावना ने सागर चा हात पकडत चल आज आपण देवदर्शन करूयात असे म्हणत दादर ला जाणारी ट्रेन पकडण्या करिता प्रस्थान केले, ट्रेन प्लॅटफॉर्म ला लागलेलीच होती, त्या मध्ये बसून पुढील काही वेळात ते दादारला पोहचले होते. दादर स्टेशन च्या पश्चिम दिशेने बाहेर पडत टॅक्सी पकडून सिद्धी विनायक ला रवाना झाले. भावना.. अरे आज आपण जोडीने दर्शन घेऊयात आणि प्रार्थना ही करूयात आपल्या दोघां करिता☺️. इथे आपली इच्छा किंव्हा नवस बोललेले पूर्ण होतात, याकरताच खूप.. लोकांची इथे गर्दी असते आणि आज योगा योगाने मंगळवार आहे रे.. म्हणून मी इथे येण्याचे नियोजन केले. चालेल ना तुला? असे भावना म्हणता सागर ने ही हसतच मूक संमती दिली. काही वेळातच ते सिद्धी विनायक मंदिराजवळ पोहचले होते. टॅक्सीतुन उतरून हार फुल वाल्याकडून ताट घेऊन मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला, चप्पल रेक मध्ये ठेऊन पुढे दर्शन रांगेत उभे राहून जस जशी रांग पुढे सरकत होती, तस तसे दोघेही पुढे सरकत होते. अर्धा पाऊण तासाने श्री गणरायांचे दर्शन घेत दोघांनी ही इच्छा व्यक्त करत वंदन करून बाहेर पडले.


      सागरला संध्याकाळी ट्रेन ने निघायचे असल्याने दर्शन घेऊन दोघे ही प्रसन्न मनाने पुन्हा रूम वर जाण्यास निघाले. येईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते, संध्याकाळी सागर ला सोडण्या करिता भावना घरी न जाता त्याच्या सोबतच रूम वर थांबली होती. दुपारचे जेवण त्याच्या सोबत घेत दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. गप्पांच्या नादात चार वाजून गेले होते, निघायची वेळ  समीप आली होती, त्यामुळे सागर ने आवरायला सुरवात केली, भावनाने त्याचे कपडे बॅग मध्ये व्यवस्थित ठेवले. सागर ही अंघोळ करून तयार झाला होता. जस जशी निघायची वेळ जवळ आली होती तस तसे भावना भावुक होत होती. सागर निघण्यास तयार होताच भावनाने भावुक होऊन त्याला घट्ट मिठी मारून सागर.. मला तुझ्या शिवाय नाही रे करमणार असे म्हणत तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले होते. तिचे अश्रू पुसत सागर ने तिला धीर देत नको अशी रडूस, माझ्या मनाचे पण हेच हाल आहेत, जमले तर अधून मधून येत जाईन शांत हो नाहीतर आज ही मला इथेच थांबावे लागेल असे म्हणत तिच्या कपाळावर ओठ टेकवून मस्करीत.. जाता जाता मला वाटले की तू तुझ्या रसाळ मधाळ ओठांनी मला मंत्रमुग्ध करशील ☺️ पण तू तर रडतच बसलीस, कदाचित आज माझ्या नशिबात नसेल ते असे म्हणताच,... गप्प बस शहाण्या असे म्हणत त्याच्या मागील केसांमध्ये एका हाताची बोटे खिळवून तिने त्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेत त्याला विचारले बस्स... की अजून ओठांचा रस हवाय असे म्हणत पुन्हा तिने त्याचे चुंबन घेऊन चल आता... नाहीतर आज ही इथेच थांबावे लागेल☺️ म्हणत त्याचा हात हाती धरत रूम मधून निघून रिसेप्शन काउंटर वर बिल पेड करून cst करिता निघाले. 

 दोघे ही दादर स्टेशन ला पोहचले तिकीट काढून cst ला जाणारी ट्रेन करिता प्लॅटफॉर्म वर उभे होते. प्लॅटफॉर्म वर येताच सागर मान हलवत हसला☺️, भावनाने त्याला अरे काय झाले? का असा हसतोयस? सांग तरी असे विचारले असता, काही नाही ग ☺️.. याच स्टेशन वर माझं इथल्या लोकांनी धक्के देऊन जंगी स्वागत केलेलं आठवले म्हणून हसायला आले. तशी भावना ही हसली. ट्रेन येताच सागर आणि भावना ट्रेन पकडून cst ला रवाना झाले होते. काही वेळातच दोघे cst ला पोहचले आणि मेल एक्सप्रेस जिथे लागतात त्या ठिकाणी निघाले. प्लॅटफॉर्म ला सह्याद्री येत आहे चे अनाऊन्समेंट झाली होती. तिथे असलेल्या ब्लॅकबोर्ड वर रिझर्वेशन नुसार कितवा बोगी आहे हे पाहून त्या नुसार ते प्लॅटफॉर्म ला उभे राहिले.

      

      दोघे ही शांत होते, होणाऱ्या दुराव्यामुळे ही शांतता होती. शेवटी सागर ने तिला विचारलेच का ग ? तु का अशी गप्प आहेस?... बोल काहीतरी. भावना.. तू निघाला आहेस ना.. आता आपण भेटू नाही शकणार या विचारानेच जरा अस्वस्थ आहे रे, बाकी काही नाही असे म्हणाली. अग भावना.. माझी पण तीच अवस्था झाली आहे, तुझ्या असण्याची तुझ्या सहवासाची मला सवय झाली आहे ग.. आणि आता आपल्याला भेटता येणार नाही त्यामूळे मी ही बैचेन झालो आहे.दोघांच्या ही मनात भयाण अशी शांतता पसरली होती. एक्सप्रेस प्लॅटफॉर्म ला आली होती, दोघांनी ही एकमेकां कडे खिन्न मनाने पाहिले दोघांच्या ही डोळ्यांत अश्रू तरळून आले होते, निघावे तर लागणारच होते. सागर ने आपली बॅग घेत बोगी मध्ये चढला त्या पाठोपाठ भावना ही चढली होती. रिझर्वेशन नुसार सीट पाहून सागर आपल्या सीट वर बसला होता. बाजूची सीट रिकामीच असल्याने भावना काही क्षण त्याच्या जवळ बसली. काय बोलावे दोघांना ही सुचत नव्हते, पाणावलेल्या डोळ्यांनी दोघे ही एकमेकांकडे फक्त पाहत होते. त्या डोळ्यांमधील अश्रूच जणू एकमेकांशी बोलत होते असे वाटत होते. यातच अचानक अग भावना... तू मला सायलीच्या घरचा नंबर दिलाच नाही.. चल दे लवकर असे म्हणताच भावना ही आपले अश्रू पुसत अरे हो रे.. मी पूर्णपणे विसरलीच होते, थांब थांब देते तुला असे म्हणत डायरी मधून तो नंबर काढून तिने सागरला दिला आणि नीट ठेव जपून नाहीतर आपल्याला बोलता नाही यायचे, अजून कुठेतरी नोट करून ठेव असे भावना म्हणाली.बर झालं तू आठवण केलीस नाहीतर काही खर नव्हतं असे म्हणत भावना ☺️ हसली. एक्सप्रेस सुटण्याची वेळ झाली होती, भावनाने त्याला घट्ट मिठी मारली आणि महिन्यातून जमल्यास एखादी चक्कर मारत जा म्हणत तिने त्याच्या कडे पाहिले, सागर ने ही तिच्या गालावर हात ठेवून हो भावना.. नक्की प्रयत्न करेन आणि आपण फोन वर दर मंगळवारी दुपारी बोलूच, तू नीट रहा आणि आता तू उतर खाली ट्रेन सुरू होईल असे सांगितले. भावना ही हो म्हणत खाली उतरली. आणि ट्रेन च्या खिडकी जवळ येऊन खिडकीवर हात ठेवून उभी राहिली त्याच्या कडे पाहत. तिच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून सागर ने तिच्या हातावर आपला हात ठेवत अश्वस्थ केले. ट्रेन निघण्या पूर्वी हॉर्न वाजला होता, तसे भावना ने त्याचा हात घट्ट पकडून डोळ्यांनीच तू नको जाऊस असे सांगत होती. सागर ने तिचे डोळे पुसत त्याला ही भरून आले होते त्यामुळे काहीच बोलायला न येत असल्याने त्याने ही आपल्या डोळ्यांनीच सांगण्याचा प्रयत्न केला. 


      ट्रेन ने हळू हळू प्लॅटफॉर्म सोडायला सुरवात केली होती, तरीही भावनाने त्याचा हात सोडला नव्हता, तीही ट्रेन सोबत चालु लागली होती, मात्र ट्रेन चा वेग वाढताच तिला त्याचा हात सोडावा लागला होता. सागर ही पटकन जागा सोडून डोर ला आला होता, त्याने ही पाणावलेल्या डोळ्यांनी तिला तो दिसे पर्यंत हात केला. इकडे भावना आहे त्याच जागी उभी राहून स्तब्ध होऊन सागर कडे पाहत होती. तिच्या डोळ्यातील अश्रूंनी हळू हळू त्याचा चेहरा धूसर झाला होता. ट्रेन ने प्लॅटफॉर्म सोडला होता, तरीही भावना खिन्न मनाने तिथेच उभी होती. इतर जणांचे तिला धक्के लागत होते, तरीही ती स्तब्ध उभी होती बराच वेळ.

बऱ्याच वेळाने भानावर आल्यावर पाणावलेल्या डोळ्यांमुळे तिला सारकाही धूसर दिसत होते, डोळ्यांमधले पाणी पुसत ती काही वेळ बाकड्यावर बसून राहिली. सागर व्यतिरिक्त तिच्या डोक्यात दुसरा कोणताच विचार घोळत न्हवता. स्वतःला सावरून भावना घरी जाण्या करिता निघाली. ट्रेन पकडून भावना दादर स्टेशन ला उतरली होती, गेले दोन तीन दिवस सतत सागर तिच्या सोबत असल्याने या क्षणी तो तिच्या सोबत नाही हे तिला प्रकर्षाने जाणवत होते. इकडे सागर ला ही तिच्या सोबत भावना नसल्याने त्याच्या साठी भकास रटाळवाना असा प्रवास होता. त्याच्या डोळ्या समोर अति भावुक झालेल्या भावनाचाच चेहरा येत होता. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर अंधार असल्याने घरांमधले आणि खांबावरील लाईट व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. तो ही तसाच खिन्न मनाने एकटक त्या दिसणाऱ्या मिणमिणत्या लाईट कडे पाहत होता. सागरसाठी हा प्रवास म्हणजे वेळ जाता जात न्हवता. 


      इकडे भावना खिन्न मनाने स्टेशन च्या बाहेर पडून घरी जाण्या करिता टॅक्सी पकडून निघाली होती. तिने सांगितल्या नुसार टॅक्सीवाल्याने ती राहात असलेल्या सोसायटी समोर टॅक्सी थांबवली होती, पण भावनाचे लक्षच न्हवते. अरे मॅडम.. क्या आपको उतरना नही है क्या? असे टॅक्सीवाल्याने विचारता भावना भानावर आली होती. सॉरी भैया.. मेरा ध्यान नही था.. असे म्हणत पैसे देऊन टॅक्सी तुन उतरून घराकडे निघाली. डोरबेल वाजवता आईने दरवाजा उघडला होता, तिचा उदास झालेला चेहरा पाहता आईने काय ग... काय झाले आहे तुला? बरं नाही का वाटत? असे विचारले पण काही न बोलता भावना आपल्या रूम मध्ये गेली होती. आईने पण इतकं काही झालं नसेल कंटाळा आला असेल असे समजून ती पण आपल्या कामाला लागली होती. जेवण तयार झाले होते सगळे जेवायला आले होते, पण भावना आवाज देऊन ही तिच्या रूम मधून बाहेर आली न्हवती. तिला हा दुरावा सहन होत नसल्याने उशी  (पिलो) मध्ये चेहरा घालून रडत होती. भावनाची आई तिच्या रूम मध्ये तिला उठवायला तिच्या जवळ आली असता भावना ने आई म्हणत तिच्या कुशीत जाऊन रडू लागता पुन्हा आई ने अग सांग तरी.. मघाशी पण काहीच बोलली नाहीस आता तरी  सांग असे म्हणता, भावना रडतच काही नाही ग आई.. असे  म्हणत उठली, आणि तिच्या आई सोबत जेवायला गेली. जेवण करताना काहीच न बोलता शांत, कोणत्या तरी विचारात मग्न आहे हे तिच्या आई वडिलांना दिसत होते, भावनाच्या वडिलांनी पण तिला विचारले असता भावना काहीच न बोलता शांत होती. जेवण होताच आई वडिलांना गुड नाईट म्हणत पुन्हा तिच्या रूम मध्ये निघून गेली होती. बेडवर स्वतःला तिने झोकून दिले होते. ती पूर्ण रात्र भावना जागी होती, सागर आणि तिने घालवलेल्या प्रत्येक क्षणांना भावना उशी आपल्या छातीला कवटाळून कुरवाळत होती. 

      

      इकडे सागर ला ही झोप काही येत न्हवती, ट्रेन मधले सारे जण झोपेत आणि हा मात्र तिच्या आठवणीत तळमळत होता. कधी एकदाचे कोल्हापूर येतंय असे त्याला झाले होते, सरता रात्र सरत नव्हती. इकडे भावनाने पूर्ण रात्र उशी छातीला कवटाळून सागरच्या आठवणीत अश्रूंशी जवळीक केली होती.पहाट होऊन दिवस उगवू लागला होता, तरीही दोघे ही जागेेच होते एकमेकांच्या आठवणीत. भावनाचे डोळे रात्रभर जागून आणि रडून सुजले होते. उठून चेहरा स्वछ धुऊन पुन्हा बेड वर येऊन टेबल वर असलेले पुस्तक चाळत होती. इकडे कोल्हापूर स्टेशन आले होते, सागर आपली बॅग घेऊन ट्रेन मधून उतरला होता. स्टेशन मास्टर ला विनंती करून मित्राच्या घरी फोन करून त्याला घ्यायला बोलावले होते. तोपर्यंत बाहेर मस्तपैकी चहाचा झुरका घेत त्याची वाट पाहत होता.

सागरचा मित्र वैभव बाईक घेऊन पोहचला होता, त्याला बघताच सागरने ए वैभ्या... म्हणत जोराची हाक मारली. वैभव ने पण त्याला पाहताच लगेच बाईक त्याच्या कडे वळवली. सागरने चहावाल्याला एक स्पेशल बनवायला सांगितले, तोपर्यंत वैभव ने सागरवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती. कारण ही तसेच होते, सागरने जाताना मित्रां सोबत पिकनिक ला निघालो आहे असे घरी सांगितले होते, त्यामुळे मित्रांना गावात फिरता देखील आले नव्हते. तसे सागर स्वतः आणि सागरचे मित्र हे जीवाला जीव लावणारे होते. वैभव ने केलेल्या प्रश्नांच्या सरबत्ती नंतर सागर... अरे हो हो...☺️ सांगतो जरा धीर धर, सांगतो सगळं भावा.... चहा तर घे आधी म्हणत चहा चा ग्लास पुढे केला. इकडे भावनाने हातात घेतलेले पुस्तकाचे पान नि पान चाळून झाले होते. इच्छा नसताना ही उठून अंघोळ करून चहा पिण्या करिता किचन मध्ये जाऊन आई... चहा दे ग जरा.. डोकं खूप दुखतंय माझं असे म्हणत तिथेच बसली. आईने ही तिला लगेच मस्तपैकी आलं वेलची पूड टाकून चहा करून दिला. दिलेला चहा पिऊन बाहेर हॉल मध्ये आली होती.


     इकडे सागर ने वैभव ला त्याच्या आणि भावनाच्या नात्या बद्दल सारकाही अगदी पहिल्या भेटीपासून ते आदल्या दिवशी पर्यंतचे सगळं काही सांगितले. वैभव आश्चर्याने त्याच्या कडे पाहतच ओह.... आपण तर आमच्या ही पुढे गेलात की राव... आपण तर लव गुरू झालात. आम्हाला ही शिकवा जरा कसं पटवायचं पोरींना? म्हणत हसतच☺️ त्याला हात जोडले. सागर ने वैभव ला हे सारे सांगण्या आधी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नाही आणि सध्या सांगू ही नकोस असे त्याच्या कडून वचन घेतले होते. साऱ्या गप्पा मारून झाल्यावर निघताना आयला... सागर काहीही म्हण.. वहिनी दिसायला भारीच आहेत रे असे वैभव म्हणाला. सागर ने हसतच☺️ हो रे... आहेच ती सुंदर तिच्या कधी प्रेमात पडलो हे मलाच कळले नाही. असे म्हणत दोघे ही बाईक वर बसून घरी जाण्यास निघाले होते. 


     वैभव बरोबर गप्पा मारल्याने सागर जरा नॉर्मल झाला होता, पण बाईक वर  घरी जाताना वैभव शी गप्पा मारताना भावना शिवाय सागर कडे दुसरा कोणता विषयच नव्हता. गप्पांच्या नादात घर कधी आले हे सागरला कळले ही न्हवते. सागर ला सोडून वैभव जाता जाता, संध्याकाळी भेटुयात.. नेहमीच्या ठिकाणी.. असे म्हणत निघून गेला. इकडे भावना सागर पोहचला असेल ना घरी? याची खातरजमा करण्या करिता सागरच्या घरी फोन करूयात की नको? या विचारात होती. असे ही कोल्हापूूूर सोडल्या पासून भावनाने सागर सोबत असल्याने शुभदा ला फोन ही केला नव्हता, जवळ जवळ विसरलीच होती. असे ही शुभदा तिच्या वर चिडणार ह्याची तिला जाणीव होतीच. शुभदा शी बोलता बोलता सागर पोहचला की नाही याचा अंदाज ही येईल असे विचार करून शेवटी तिने शुभदाच्या घरी फोन केला. फोनची रिंग वाजत होती, आणि फोन ही शुभदा नेच उचलला होता. हाय शुभदा कशी आहेस असे म्हणताच, काय ग तुला मी आत्ता आठवली का? काहीच बोलू नकोस माझ्या शी. भावनाला ती खूप चिडली आहे याचा अंदाज आला होता, सॉरी ग शुभदे... ए प्लीज ऐक ना जरा माझं असे म्हणता, पण ती काही ऐकायला तयारच न्हवती, मी तुझ्या घरी तू  पोहचलीस की नाही? यासाठी फोन केला होता, पण काकूंनी उचलला त्यांच्या कडून कळले तू पोहचलीस ते. आणि तू घरी नसतेच असे ही काकू म्हणाल्या. अग शुभदा हो जरा बिझी होते ग.. त्यामुळे नाही केला तुला फोन, सॉरी म्हणतेय ना मी तुला. इतक्यात शुभदा आई ग... सागर आला आहे ग म्हणाली. भावनाने हे ऐकले आणि तिचा जीव भांड्यात पडला होता. 


शुभदा ने तिच्या आईला सागर आला आहे हे सांगताना भावनाने कळत नकळत ऐकले होते, त्यामुळे भावना चा खऱ्या अर्थाने जीव भांड्यात पडला होता. शुभदा मात्र अजून ही चिडलेलीच होती. भावनाने अनेकदा शुभदा ची माफी मागितल्या नंतर बऱ्यापैकी तिचा राग शांत झाला होता. आणि आता जरा तिच्या शी नॉर्मल बोलायला लागली होती. काय ग.. शुभदे एवढं रागवायचं असतं का?.., माझं काहीच ऐकून घ्यायला तयार न्हवतीस, मला किती वाईट वाटलं.. असे भावना म्हणताच,  नाही ग भावना... तस नाही पण निदान एक तरी फोन करायचा होतास ना मला, याआधी तू असं कधीच वागली न्हवतीस म्हणून जराशी चिडली होती मी☺️ असे शुभदा म्हणताच, भावना  हो का?..शुभदे तू भेट ग मला तुला तर मी बघणारच आहे. असे भावना म्हणताच शुभदा 😊 हसतच मग ये ना इकडे.. बोलताच दोघी ही 😊😊हसायला लागल्या होत्या. बऱ्याच दिवसा नंतर दोघी एकमेकींशी बोलत होत्या, त्यामुळे बराच वेळ मनसोक्त गप्पा मारत होत्या.


      इकडे सागर त्याच्या रूम मध्ये जाऊन अंघोळ करून आला अन सोफ्या वर मुद्दामहून येऊन बसला होता, आणि जाणून बुजून भावनाला कळावे म्हणून तिथूनच आईला जोरात आवाज देऊन आई ग... नाष्टा दे.. भूक लागली आहे कालपासून काहीच खाल्ले नाही असे सांगत होता. भावना ने ही शुभदा ला विचारलेच काय ग.. काय झाले सागरला ओरडायला? तशी शुभदा ही भावनाला तूच विचार त्याला असे म्हणत तिने सागर कडे फोन दिला. तसा सागर ने तिच्या कडून फोन घेत तिच्या शी बोलू लागला होता, इकडे मात्र भावना जरा शुभदा च्या कृतीने गडबडली होती. पण सागरचा आवाज ऐकून तिला समाधान वाटले होते, काय बोलू त्याच्याशी हेच सुचत नव्हते, जेमतेम बोलून सागर ने ही लगेच शुभदा कडे फोन दिला. गप्पांची सांगता करत दोघींनी बाय.. लव्ह यू, मिस यू म्हणत फोन ठेवले होते. सागर चा आवाज ऐकून भावनाला आनंद झाला होता, बऱ्यापैकी ती आता नॉर्मल झाली होती. आणि असे ही ठरल्या नुसार उद्या येणाऱ्या मंगळवारी ते फोनवर बोलणार असल्याने भावना खुश होती. त्या आनंदात बेड वरील उशी (पिलो) हाती घेऊन आपल्या छातीला कवटाळून गोल फिरत प्रेमावरील (त्या हॉटेल च्या रूम वर रोमँटिक मूड मध्ये असताना टीव्हीवर सुरू असलेले "तुम मिले.. दिल खिले और जिने को क्या चाहीये") हे गाणं गुणगुणत होती, मधेच स्वतःलाच आरशात पाहून लाजत होती. खऱ्या अर्थाने प्रेमात पडल्यावर काय होत असते हे ती प्रत्यक्ष अनुभवत होती. तिच्या गालावरची कळी खुलली होती. भावना ची आई आपली लेक आनंदी आहे नॉर्मल झाली हे पाहून  त्याही खुश होत्या. दुपारचे जेवण घेऊन रात्रभर जागरण झाल्याने भावना जराशी वामकुक्षी घेण्यासाठी आपल्या रूम मध्ये जाऊन बेडवर आडवी झाली होती. 


      इकडे सागर नाष्टा करून आपल्या बहिणीशी म्हणजेच शुभदा शी गप्पा मारत बसला होता. गप्पा मारल्या नंतर रानात फेरफटका मारण्या करिता गेला. दोन तीन दिवस तो इथे नसल्याने पिकं नीट आहेत ना.. सारकाही सुरळीत आहे याची खातरजमा करून सागर रानातल्या घरासमोरील जागेत लाकडी काथ्याची बांधणी असलेल्या कॉट वर निवांत आडवा झाला होता. सळसळणाऱ्या उसाच्या त्या पात्त्यांचा आवाज कानाला मंजुळ वाटत होता. त्या मंजुळ आवाजाने सागरला भावना त्याच्या बरोबर रान बघायला आली असताना चे सारेकाही आठवले होते, तिचा तोल जाऊन ती पडता त्याने तिला सावरता  तिचे ते अलगद पडणे अन तो पदर सरकता त्याचे नकळत तिच्या अंगावर पडणे अन एकमेकांत गुंतने हे आठवून त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या हास्याने सागर ने कूस बदलत स्वतःहा त्या आठवणींमध्ये रममान झाला होता. यात कधी सांज झाली हे त्याला ही कळले नव्हते.


       इकडे भावनाला कधी उद्याचा दिवस येतो आणि कधी त्याच्याशी बोलेन असे झाले होते. संध्याकाळ होताच चहाचा कप घेऊन चहाचा झुरका घेत बाल्कनीतून डोळ्यांना सुखावणारा नयनरम्य सूर्यास्ताचा नजारा बघत होती. इकडे सागर तिच्या आठवणीत रमला होता. संध्याकाळ झाल्याने पाखरांची घरट्याकडे परतताना त्यांची किलबिल सुरू झाली होती. त्या आवाजाने सागर भानावर आला आणि घरी जाण्यासाठी निघाला. जाता जाता वैभव आणि इतर मित्रांना भेटून घरी परतला होता. रात्रीचे जेवण सर्वांबरोबर घेऊन सागर आपल्या रूमवर जाऊन झोपी गेला होता. भावना ने ही रात्री जेवताना आई वडिलांशी गप्पा मारून तिच्या रूम मध्ये झोपण्या करिता गेली.

  सागरच्या गोड आठवणीत भावना ला कधी झोप लागली हे तिला ही कळले नाही. सकाळी आईने खिडकीचा पडदा उघडल्याने खिडकीतून चेहऱ्यावर पडलेल्या उन्हाच्या किरणांनी भावनाला जाग आली होती. बिछान्यात उठून बसली अन चेहऱ्यावरील हास्या सोबत तिने आईला गुड मॉर्निग म्हणत आपला बिछाना सरळ करत पांघरुणाची घडी घातली. सकाळच्या सर्व विधी उरकून नाष्टा करण्या करिता हॉल मध्ये येऊन बसली होती. इकडे सागर ही सकाळी लवकर उठून शेतातली कामे करण्यास गेला होता. सकाळची सर्व कामे उरकून मित्रांसमवेत गप्पा मारून घरी निघाला. घरी पोहचताच सागर ने अंघोळ अन  पोटभरून नाष्टा करून भावनाला फोन करण्या करिता बाईक वरून आपल्या मित्राच्या फोन बूथवर जाण्यास निघाला. इतक्यात शुभदाने सागरला आवाज देत थांबवले आणि कोल्हापूरच्या मार्केट मध्ये मला सोड असे सांगताच, सागर ला तिला काय म्हणावे काहीच सुचत नव्हते, याच विचारात असताना शुभदा त्याच्या बाईक वर येऊन बसलीही. आता मात्र सागरला तिला सोडण्या शिवाय त्याच्याकडे कोणता पर्यायच उरला नव्हता. एक वाजता भावनाला फोन करायचा असल्याने वेळ कशी साधायची  याच विचारात सागर बाईक चालवत होता. 


      इकडे भावना सायली कडे जाण्या करिता तयारी करत होती. निघण्यापूर्वी सायलीला फोन करून आठवण करून दिली, आणि चुकून ती पोहचण्याच्या आत जर सागर चा फोन आला तर त्याला थांबवण्यास सांग असा निरोप ही तिच्या जवळ दिला होता. काही वेळातच भावना निघणार होती. इकडे वेळ  साधण्यासाठी सागर वेगाने बाईक चालवत होता, सागर आणि शुभदा मार्केट ला पोहचले होते. तु तुझी काय ते खरेदी कर मी माझं एक महत्वाचे काम उरकून येतो असे म्हणत सागर माघारी फिरला आणि मित्राच्या बूथ वर जाण्या करिता निघाला. इकडे भावना सायलीच्या घरी पोहचली होती, आणि त्याच्या फोन ची वाट पाहू लागली होती. ठरल्या वेळेनुसार एक वाजता बोलणार होते, दीड वाजुन गेला होता पण सागर चा फोन काही आला नव्हता. जस जसा वेळ जात होता भावना च्या मनाची घालमेल वाढू लागली होती. दोन वाजून गेले होते तरी सागर चा फोन न आल्याने भावनाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. इकडे सागरला कधी एकदाचा पोहचतो आणि भावनाला फोन करतो असे झाले होते. पुढच्या पंधरा मिनिटात सागर मित्राच्या फोन बूथ वर पोहचला होता, इकडे भावना दुःखी मनाने सायलीचा निरोप घेऊन जाण्याच्या तयारीत होती. सायली ही तिला डोर पर्यंत सोडण्या करिता आली होती. सागरने कशीबशी बाईक लावून  सायलीच्या घरी फोन केला, फोनची रिंग ऐकून सायली ने भावनाला आवाज देऊन थांबण्यास सांगितले फोन वाजतोय नको जाऊस?.. कदाचित त्याचाच फोन असेल असे म्हणताच भावना पळतच त्या फोन जवळ आली होती, आणि फोन उचलून हॅलो कोण? असे विचारता पलीकडून मी सागर बोलत आहे असे शब्द कानी पडताच भावनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. काय रे सागर... किती वाट पहायला लावलीस? मी निघालीच होती, अजून मिनिटभर जरी उशीर केला असतास ना.. तर आपली फोन वर भेट नसती झाली. सागर ने होय ग.. झाला जरा उशीर.. सॉरी म्हणत अग तुलाच फोन करायला निघालो होतो, पण ताईने तिला मार्केट मध्ये सोडायला सांगितले, त्यामुळे तिला सोडून पुन्हा इकडे आलो तुलाच फोन करायला. तुझ्या शी बोलून तिला घ्यायला परत जाणार आहे म्हणून आज गडबड झाली. ते जाऊ देत तू कशी आहेस? मला तर तुझ्या शिवाय करमतच नाही ग? काल शेतात होतो, तू त्यावेळी पडली होतीस.. आठवतंय ना तुला.. ते सार काही आठवले☺️आठवलं काय.. ते तर माझ्या डोळ्या समोर पुन्हा घडल्या सारखे भासत होते ग. तुझ्याच आठवणीत रमलो होतो. अग तू बोल ना? काहीच का नाही बोलत? 


      अरे हो हो... तू बोलून देेशील तर ना?☺️☺️ हसतच भावना त्याला म्हणाली होती. काही नाही रे.. त्या दिवशी मी तुझ्याच आठवणीत रात्रभर तळमळत होते. काहीच सुचत नाही रे. ये ना भेटायला येशील का रे? सागर.. आता लगेच कसे येऊ मी पुढच्या महिन्यात प्रयत्न करेन.असे म्हणाला. ठीक आहे सागर.. पण नक्की ये मी तूझी आतुरतेने वाट पाहत आहे असे भावनाने त्याला सांगताच, हो नक्की तुला भेटून जाईन चल ठेऊ का आता फोन?.. तिकडे ताई वाट पाहत असेल.. हो हो चल बाय काळजी घे, लव्ह यू सागर असे म्हणताच पलिकडून सागर ने ही आय लव्ह यू टू असे म्हणत फोन ठेवला. पवन त्याचा मित्र त्याच्या कडेच बघत होता. सागर ने त्याला काय ☺️ असे म्हणत नंतर सांगतो , कोणाला बोलू नकोस असे सांगून शुभदा ला घेण्यास पुन्हा निघाला. इकडे भावना ने सायलीला आनंदाने मिठी मारून थंक्स सायली असे म्हणत चल मी येते म्हणत निघाली. सागरची बहीण शुभदा त्या रणरणत्या उन्हात त्याची वाट पाहून वैतागली होती. अर्धा पाऊण तासात सागर पोहचला होता. त्याला पाहताच काय रे सागर? एवढा उशीर का रे.. कसलं काम होत तुझं.. असे म्हणत शुभदा बाईक वर बसली आणि चल आता शहाण्या.. लवकर असे म्हणाली तसे सागर सॉरी ग ताई... खरचं  खूप महत्वाचे काम होते ग.. त्यामुळे वेळ झाला  असे म्हणत सागर ने बाईक सुरू करून दोघे ही घरी जाण्यास निघाले.

Suchi sexhaina
Suchi sexhaina

Desi Adult Sex Stories,Telugu Sex Stories,Bangla Sex Stories,Hindi Sex Stories,English Sex Stories,Incest Sex Stories,Mobile Sex Stories,Desi Indian Sex Stories

1 comment: