कथा :- नकळत सारे घडले भाग-3
अग तू मला काल इतके सुंदर आणि कायम स्मरणात राहील अशी भेट दिलीस, मग मला
नको द्यायला, म्हणून हे नियोजन केले. मग... कस वाटलं तुला हे सरप्राईझ☺️
सागर ने असे तिला विचारले. भावनाने ही... मस्करीतच हो.... आवडलं असतं, जर
थोडीशी तरी कल्पना दिली असतीस तर. तसा सागर चा चेहरा पडल्या सारखा झाला
होता, पण लगेचच भावना ने सांगितले, अरे... मी मस्करी केली रे... मग किती
रडवलेस.... कालपासून मला. पण खरचं.. खूप छान गिफ्ट आहे माझ्यासाठी, असा..
तू माझ्या सोबत☺️. असाच कायम रहा माझ्या सोबत असे म्हणून त्याच्या कडे बघत
मनापासून हसली.
भावना खुप खुश होती, सांगली स्टेशन आले होते, सागर च्या हातात हात
घालून भावना त्याच्या शी गप्पा मारत होती. काय? आणि किती?... बोलू असे तिला
झाले होते. तिची अखंड बडबड सुरू होती, आणि सागर ही सारकाही ऐकत होता.
भावना ने त्याला विचारले... काय रे सागर ? तू याआधी मुंबईला आला होतास का?
सागर ने☺️ हसूनच नाही ग .. पहिल्यांदाच येत आहे असे सांगितले. म्हणजे तू
मुंबई पण पहिली नाहीस, अरे वाह... किती मस्त ना.... खूप मजा करूयात आपण...
मी दाखवते तुला असे सागरला म्हणाली. अग भावना मी तुला सोडून लगेच निघणार
आहे, मी नाही थांबणार... आणि जरी थांबायचे म्हटले तरी माझे कोणी मित्र
परिवार नाही, नातेवाईक आहेत पण कसे जाऊ? घरी कळले तर गडबड होईल असे म्हणता
भावना नाराज झाली होती.
थोड्या वेळेसाठी ती काहीच बोलली नाही. सागर तिला समजवण्याचा प्रयत्न
करीत होता, अग.. आपल्या दोघां बद्दल घरी कळले तर?... म्हणून मी नाही म्हणत
आहे. पण काही केल्या भावना चा रुसवा जात न्हवता. शेवटी एक मोठा दिर्घ श्वास
सोडून... सागर ने ठीक आहे... बाबा तुझ्याच मनाप्रमाणे करूयात आपण☺️. तशी
भावनाच्या गालावर कळीच☺️☺️ खुलली होती. त्यातच तिचे ते मधाळ हास्य,
चेहऱ्यावर पडलेल्या उन्हामुळे आणि हवेने उडणाऱ्या बटांमुळे ती अधिकच सुंदर
दिसत होती.
ट्रेन ने पुणे स्टेशन गाठले होते. दोघांना ही भूक लागलेली होती. सागर
ने.. तू काय खाणार?... असे विचारता तिने इथे भेळ खुप छान मिळते आणि त्या
सोबत पेरू आणावयास सांगितले. सागर ने पटकन ट्रेन मधून उतरून तिने
सांगितल्या नुसार ओली भेळ आणि चांगले निवडक पेरू घेऊन आला. दोघे ही फ्रेश
होऊन, ओल्या भेळ चा आस्वाद घेतला, भावनाने सांगितल्या नुसार भेळ खरच चविष्ट
होती. सागरला ला ही भेळ आवडली होती, पुन्हा जाऊन दोघां करिता त्याने ओली
भेळ आणून ती त्यांनी संपवली देखील. दहा ते पंधरा मिनिटां नंतर ट्रेन पुणे
स्टेशन वरून मार्गस्थ झाली होती.
मुबईत कोण कोणती ठिकाणे चांगली आहेत त्यांच्या बद्दल त्याला माहिती देत होती. मधेच सागर ने तिला मला लोकल ट्रेन मधून प्रवास करायचा आहे, खुप काही ऐकून आहे, म्हणे खूप गर्दी असते, मला ती गर्दी बघायची आहे आणि त्यातून प्रवास ही करायचा आहे. तशी भावना म्हणाली, लोकल ट्रेन?... अरे ती तर मुंबईची लाईफ लाईन आहे... शान आहे... ती नाही तर मुबई नाही. पुढच्या काही वेळातच ते दादर ला पोहचणार होते, सागर ही पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने तो ही उत्सुक होता. .....
काही क्षणातच ट्रेन दादर स्टेशनला पोहचली, भावना आणि सागर लगेज घेऊन उतरण्याच्या तयारीत होते. जस जसे पुढचे पॅसेंजर उतरता दोघे ही पुढे सरकत दादर स्टेशन ला उतरले. उतरताच सागरचे मुंबईतल्या धक्यांनी जंगी स्वागत झाले होते, काय होतय हे त्याला कळलेच न्हवते. भावनाने त्याला हाताला धरून त्या गर्दीतून ओढून घेतले. आणि सांगितले, असे उभे नको रहात जाऊस, पटकन बाजूला व्हायचे☺️ कळले ना?.... मुंबई कशी आहे ती, इथे ऑफिस सुटल्यावर प्रत्येकजण घरी जाण्याच्या तयारीत असतो, त्याला ट्रेन आणि ट्रेनचा डोर शिवाय काही दिसत नसते☺️☺️... चल आता असे म्हणत ते ब्रिजवर जाण्यास निघाले.
दादर ब्रिजवर चढताच हा एवढा जनसागर बघून सागर अचंबित झाला होता. कोल्हापूरला मोर्चा अन जत्रेतच इतकी किंव्हा कमीच लोकं पाहिली असतील. या गडबडीत मात्र भावना पुढे निघून गेली होती. तिला तो आपल्या पाठोपाठ च आहे असे समजुन ती चालत राहिली होती. सागर ला भावना कुठेही दिसत नसल्याने कावरा बावरा झाला होता, त्याची नजर तिथेच उभे राहून तिलाच शोधत होती त्या गर्दीत. इकडे सागर आपल्या सोबत नाही हे कळताच भावना खूपच घाबरली होती, काय करावे तिला सुचत नव्हते, ती पुन्हा माघारी फिरून त्याला शोधू लागली. त्या गर्दीत इतरां पेक्षा वेगळा आणि नवखी व्यक्ती म्हणून सागरला तिने पटकन ओळखले आणि धावत जाऊन त्याला बिलगली, आय एम सॉरी सागर.....😢 सगळी माझीच चुक आहे, मला कळायला हवे होते असे म्हणत त्याच्या सोबत गर्दीतून वाट काढत चालू लागली होती.
दादर इस्ट मधून बाहेर निघाल्या वर तिने सागर करिता चांगल्या हॉटेल ची चौकशी करून त्याच्या करिता योग्य रूम बुक केली आणि रूममध्ये जाऊन सारकाही व्यवस्थित आहे का? हे पाहून आणि या इंटरकॉम वरून काय हवे ते मागव. असे म्हणत त्याच्या गालावर किस करून घरी जाण्या करिता निघाली. तिला घरी पोहचायला जरा उशीरचं झाला होता, घरातले सर्वजण तिच्या साठी जेवायचे थांबले होते. पटकन फ्रेश होऊन साऱ्यांसोबत तीही जेवायला बसली, जेवता जेवता तिने कोल्हापूरला केलेली धमाल, मजा मस्तीचे किस्से आणि विशेष म्हणजे तिला ते गाव खूपच आवडले असे सांगितले. जेवण झाल्यावर मी उद्या मैत्रिणीकडे जाणार आहे आणि यायला उशीर होईल, असे सांगून झोपावयास निघून गेली. उद्या सागरला भेटायचे या विचारातच ती कधी झोपी गेली तिलाच कळले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आईने बनवलेला नाष्टा खाऊन सागरच्या रूम कडे रवाना झाली. तस तिच्या घरापासून जास्त लांब नसल्याने लगेच ती सागर ज्या हॉटेल वर थांबला होता तिथे पोहचली होती. रिसेप्शन वर नोंद करून तिने सागरच्या रूम ची डोर बेल वाजवली. बराच वेळ बेल वाजवल्या नंतर सागर ला जाग आली आणि त्याने डोर उघडला. अरे सागर तू अजून तयार नाहीस असे म्हणत त्याला अंघोळीला पाठवले, त्याचे बाकीचे आवरेपर्यंत कॉल करून नाष्टा मागवून ठेवला होता.
भावनाने त्याला मस्करीतच... ए काय रे सागर... ☺️नक्की काय बघतोयस? इमारती की मुली😊 विचारले असता सागर ने पण ☺️ हसतच सुंदर मुली पाहत आहे, असे म्हणत तो ही मस्करीत हसला. गेट वे ऑफ इंडिया येता दोघे ही उतरले. जगातील एक भव्य दिव्य वास्तु आणि ताज हॉटेल हे याची देही याची डोळा पाहत होता. पाहण्या सारखेच होते. भावना त्याच्या हातात हात घालून त्याला गेट वे ऑफ इंडिया चारी ही बाजुने दाखवत होती. त्याच जोडीला खट्याळ पणे प्रेमात अखंड बुडालेले प्रेमीयुगल ही दाखवत होती. ते पाहून सागर जरा लाजतच होता. त्या उधानलेल्या अथांग समुद्राकडे सागर एकटक पाहत होता, त्याला त्यातून जागे करून भावनाने सागर बरोबर तिथे फिरणाऱ्या फोटोग्राफर कडून विविध पोझ मध्ये त्याच्या सोबत फोटो त्याची आठवण म्हणून काढून घेतले. फोटॊ काढताना सागर मात्र लाजत होता. फोटो काढून झाल्यावर लॉंच मधून दोघांनीही त्या अथांग समुद्र सफारी चा आनंद अनुभवला.
सागर ने भावना.. आता कुठे जायचे? असे विचारता तिने क्षणाचा ही विचार न करता मारिन ड्राईव्ह आणि बीच वर जाऊयात असे म्हणत त्याचा हात हाती घेऊन टॅक्सी करिता उभे होते, टॅक्सी मिळताच तिथून मारिन ड्राईव्ह करिता रवाना झाले. मारिन ड्राईव्ह ला पोहचताच त्या मारिन ड्राईव्ह च्या दगडी तटबंदी (दगडी बांधकाम असलेल्या भिंती) वर ऊभे राहून वाऱ्याच्या सोबत उसळणाऱ्या त्या बेभान लाटांचा आणि धुंद करणारा त्या लाटांचा आवाज असे मनमोहक नजारा दोघे ही शांतपणे पाहत होते. भावनाने त्याला विचारले.. सागर कसा आहे?... हा नजारा. सागर च्या ओठावर अप्रतिम, शब्दात नाही ग... मी तुला सांगू शकत. थँक्स☺️ भावना तू मला थांबवून घेतलेस... त्या मुळेच मी हे दृष्य पाहु शकत आहे. पुन्हा एकदा थँक यू... सो मच. असे म्हणत ते त्या भिंतीवरून चालू लागले.
चालताना इथे ही बिनधास्त पणे प्रेमी युगल त्याच्या प्रेमात मश्गुल होते. भावना ने त्याला डोळ्यांनीच खुणावले बसायचे का रे असे☺️. तसे सागर ए काही ही काय☺️ असे म्हणत पुढे चालू लागला. छान पैकी योग्य जागा बघून दोघे ही बसले. सागरने तिचा हात आपल्या हाती घेउन त्या अथांग सागरला पाहत होता, आणि भावना तिचे डोकं त्याच्या खांद्यावर ठेवुन प्रेमावरील गाणं गुणगुणत होती.
त्याने क्षणाचा ही विलंब न करता त्या लाटांच्या दिशेने धावून गेला त्या लाटां सोबत धुंद होण्या करिता. लहान मूल जशी बेभान होऊन खेळतात तसा सागर त्या लाटांसोबत खेळत होता, भावना ही त्याच्या सोबत त्याला बेधुंद होऊन साथ देत होती. भावना जरा वेळाने त्या लाटांमधून बाहेर येऊन वाळूवर बसली होती, आणि त्याला जास्त आत नको जाऊस... सागर... असे सारखे समजावत होती. मनसोक्त मजा करून झाल्या वर सागर तिच्या जवळ येऊन बसला. तिला मिठी मारत... भावना आजचा दिवस माझ्या साठी खूप स्पेशल आहे, मी कधीच विसरणार नाही. असे म्हणता भावनाने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेऊन त्याच्या केसांमधून हात फिरवत हो का....? असे म्हणत त्याच्या गालाला चिमटा काढत शहाण्या तू तर मला सोडून लगेच जाणार होतास ना☺️, बघ माझं ऐकलस म्हणून तु आज किती खुश आहेस असे म्हणाली. सागर ही शांत पणे स्माईल देत तिच्या कडे एकटक बघत तिचे ऐकत होता. भावनाने आजुबाजूचा अंदाज घेत त्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेतले. संध्याकाळ होण्यास सुरुवात झाली होती आणि दोघे मस्त रोमँटिक मूड मध्ये होते.
वेळेचे भान लक्षात येताच विलग झाले आणि निघण्या पूर्वी खूप भूक लागल्याने त्या नयनरम्य सांज सोबत दोघांनी ही मस्त ओली भेळ आणि पावभाजी वर ताव मारला. .....
एलिफंटाच्या पायथ्याशी पोहचल्यावर दोन्ही बाजूने मन मोहक वस्तू आणि कपड्याची स्टॉल स्वरूपात दुकाने होती. सागर ने भावना करिता ती नको म्हणत असताना ही तिला आवडेल अशी चांगली पर्स घेतली, आणि स्वतः साठी एक तिच्या नावाचे ब्रेसलेट घेऊन त्या एलिफंटाच्या पायऱ्या चढु लागले. त्या जागी पोहचल्यावर तिथल्या प्राचीन गुफा लेणी त्यांचे कोरीव काम पाहण्यात सागर तल्लीन झाला होता. आणि विशेष म्हणजे तिथे असलेल्या लोकल गाईड कडून त्या प्राचीन ऋषी मुनींची निवासस्थाने तसेच लेण्यांच्या बद्दल माहिती घेत होता. दोघे ही सारकाही पाहून झाल्यावर एका लेण्या जवळ असलेल्या दगडावर निवांत बसून त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल तसेच मनसोक्त गप्पा मारल्या. भावनाला सागर ने आपल्या कवेत घेऊन.... थँक्स फॉर एवरीथिंग☺️ भावना असे म्हणत तिचा हात धरून... चल निघुयात आता असे म्हणत तिथून दोघे ही निघाले. खाली उतरत असताना एका हॉटेल मध्ये जेवण करून त्या धक्यावरून हाती हात घेउन त्या लाटांचा मनमोहक नजारा बघत चालत लाँच जिथून निघतात तिथे येऊन लाँच ची वाट पाहात होते. लाँच येता त्यामधून पुन्हा गेट वे ऑफ इंडिया च्या दिशेने रवाना झाले होते. दोघे ही लाँच च्या किनाऱ्या जवळ उभे राहून उसळणाऱ्या त्या लाटा, त्यासोबत मासे पकडण्यासाठी आजूबाजूने उडणाऱ्या पक्षांचे थवे असे नयनरम्य नजारे बघत गेट ऑफ इंडिया ला पोहचले होते.
तिथून दादरला थांबलेल्या हॉटेल करिता रवाना झाले. हॉटेल वर पोहचताच सागर मस्त पैकी थंड पाण्याने अंघोळ करून बाहेर आला होता. त्याच्या पाठोपाठ भावना ही अंघोळीस गेली. तोपर्यंत सागर टीव्ही वर त्याचा आवडता पिच्चर क्रिमिनल बघत बसला होता. भावना चे अंघोळ करून बाहेर येणे आणि त्याच वेळी पिच्चर मधले "तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहीये" हे गाणं सुरू झाले होते. भावना बाहेर आली आहे याची सागरला कल्पना नव्हती. टॉवेल लपेटूनच ती सागर जवळ अलगद येऊन तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने वर करत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि मिश्किल पणे☺️ त्याच्या पासून जरा लांब जाऊन पाठमोरी उभी राहिली होती. सागर ला भावना चा इशारा कळताच तो तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या पाठीवरून अलगद केस बाजूला सारून तिच्या पाठीवरील ओघळणारे थेंब आपल्या ओठांनी टिपू लागला होता, आणि इकडे सुरु असलेले रोमँटिक गाणे.. तस तसे भावना बेधुंद होत होती. त्याचा ओठांचा प्रत्येक स्पर्श तिच्या नसा नसांतून रोमहर्षित होऊन तिला उत्तेजित करत होते. आता मात्र भावना ने आपल्या अंगावरील लपेटलेला टॉवेल स्वतःच्या हाताने काढून त्याला बिलगली होती. आणि आपल्या अधीर झालेल्या ओठांनी त्याच्या ओठांचे बेधुंद होऊन दीर्घ चुंबन घेत काम इच्छे च्या पुरती करिता पूर्णतः त्याच्या स्वाधीन झाली होती. सागर ने तिला अलगद उचलून बेड वर आणून दोघे ही त्या परमोच्च कामक्रीडे चा आनंद उपभोगू लागले होते. कामक्रीडेच्या त्या शेवटच्या क्षणांना तृप्त पणे उपभोगुन झाल्यावर दोघे ही एकमेकांकडे पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांना सागर.. आपल्या बोटांनी बाजुला करत... भावना.. 😢 आता मला निघावे लागणार असे तिला म्हणाला. असे म्हणताच भावना च्या डोळ्यांमध्ये पाणी तरळून आले होते.
No comments:
Post a Comment