Wednesday 30 December 2020

कथा :- नकळत सारे घडले -5

 कथा :- नकळत सारे घडले -5


 
सागर आणि शुभदा घरी पोहचले होते. बाईक वरून उतरताच शुभदा ने सागरला तिच्या हातातल्या काही बॅग घेण्यास सांगितले आणि काही स्वतः घेऊन घरात आली, तिच्या पाठोपाठ सागर ही बॅग घेऊन आत आला होता. आत येताच शुभदा ने तिच्या आईकडे... आई ग.. हा शहाणा आज मला मला तसाच मार्केटला सोडून गेला आणि लगेच येतो असे म्हणत जवळ जवळ दोन तासाने आला, दोन तास मी त्या मार्केट मध्ये उन्हात उभी होती याच्यामुळे, आई विचार याला असे कसले काम होते याला?.. जो हा दीड शहाणा मला सोडून गेला. अशी सागर ची तक्रार केली. आईने ही दखल घेत काय रे.. अस कसलं काम होत रे सागर जो तू तिला एकटीला सोडून गेलास? अरे काय रे... मी तुला विचारत आहे, बोल काहीतरी.. अग आई खरच महत्वाचे काहीतरी काम होते मी घरातून त्या साठीच निघालो होतो,  पण ताई मला थांबवून मार्केट ला सोड अशी म्हणाली तरीही मी तिला नाही असे न म्हणता सोडले ना.. यात माझं काय चुकलं आता तुच सांग? काय ग शुभदे ऐकलस का? आता झालं समाधान असे आई म्हणताच .. मग त्याने आधी का नाही सांगितले म्हणत शुभदा वैतागून तिच्या रूम मध्ये निघून गेली.


      इकडे भावना सायलीचा निरोप घेऊन घरी जाण्या करिता निघाली होती. आज सागर सोबत बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. घरी पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. मस्तपैकी फ्रेश होऊन किचन मध्ये जाऊन स्वतः साठी आणि आई करिता चहा टाकला चहा तयार झाल्यावर कपात चहा ओतून त्या दोन्ही चहाच्या कपात दुधावरली साय टाकून आईला देऊन स्वतः बाल्कनीत संध्याकाळच्या त्या रम्य नजाऱ्यासोबत चहाचा आस्वाद घेत बसली होती. चहा घेत असताना आपण आपल्या अत्यंत जिवलग मैत्रीण शुभदा ला आपल्या प्रेमाबद्दल अजून काहीच सांगितले नाही, तिला इतरांकडून कळण्या पेक्षा आपणच सांगितलेले कधी ही योग्यच असेल असा विचार तिच्या मनात घोळत होता. मावळत जाणाऱ्या सुर्याबरोबर तिच्या कपातला चहा देखील संपत आला होता. चहाचा शेवटचा घोट घेत तिने तिचा निर्णय देखील घेतला होता, तो म्हणजे आपल्या जिवलग मैत्रिणीला तिच्या आणि सागरच्या नात्या बद्दल सांगायचे. भावना तडक उठली आणि आई बाजारात गेली असल्याने फोन करण्यासाठी हॉल मध्ये येऊन शुभदा चा नंबर डायल केला. पलीकडे रिंग होताच तो फोन शुभदा च्या आईने उचलला होता, शुभदा ला आवाज देत ती येईपर्यंत काकू भावना सोबत बोलत होत्या. शुभदा येताच तिच्या कडे फोन देत शुभदा ची आई स्वयंपाकाची तयारी करण्या करिता निघून गेल्या. फोन घेताच शुभदा ने काय ग भावना कशी आहेस? मला वाटले तू विसरलीस की काय?☺️ असे विचारता भावना अजिबात नाही ह... मीच तुला फोन केलाय ☺️ कळले का? असे म्हणता दोघे ही खदखदून 😊😊 हसल्या. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर भावना ने महत्वाच्या मुद्यावर बोलावयास सुरवात केली. शुभदा मला तूला महत्वाचे काहीतरी सांगायचे आहे, कृपया चुकीचा अर्थ किंव्हा राग येऊ देऊस नकोस, शांतपणे ऐकशील ना शुभदे? असे म्हणताच.. शुभदा नाही ग.. चिडणार आणि राग कशाला येईल, तू काय ओळखत नाहीस का मला? बोल ग बिनधास्त बोल. असे शुभदा म्हणताच भावना ने सुरवात केली. शुभदा ने अडखळतच  मी.. म्हणजे मला.. असं म्हणायचं आहे की.. मी ना.. मी की नाही.. सागरच्या.. प्रेमात पडली आहे ग.. प्लिज प्लिज राग नको येऊ देऊस.. शुभदा ने आश्चर्य चकित होऊन.. काय? तू.. आणि सागरच्या प्रेमात...☺️ काय बोलतेस.. काय तू? आणि सागर पण तुझ्या... प्रेमात पडला आहे की काय? असे विचारता ...  भावना होय ग शुभदे...  प्लिज चिडू नकोस,.. आधी शांत ऐकून घे ग.. मग तुला काय रागवायचे ते रागव असे म्हणताच, भावना अग तू खरचं सांगतेस ना? हो शुभदा आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो ते आम्हालाच कळले नाही, पण हे अगदी खरं आहे. तुला कसे सांगायचे याच विचारात मी गेले कित्येक दिवस होते , पण आज ठरवले की तुला सारकाही सांगून मला माझ्या मनातील होणारी घुसमट दूर करायची होती. 


      भावनाला जसे वाटत होते त्याच्या अगदी उलट शुभदा हे सारं सारकाही शांतपणे न चिडता ऐकत होती याचे तिला आश्चर्यच वाटत होते, आणि समाधान ही वाटत होते. शुभदा ने.. अग वेडाबाई मला तू इकडे असतानाच तुझ्यातला हा बदल प्रकर्षांने जाणवला होता, पण तुझ्याच तोंडून हे ऐकायचं होत मला म्हणून मी तुला काहीच विचारले नव्हते. आणि तू या घरात आलीस तर उलट मला खरच खूप आनंदच होईल. भावनाला शुभदाचे हे बोलणे ऐकून खूप आनंद झाला होता आणि मनातला सारा तणाव क्षणात दूर झाला होता. या आनंदातच शुभदा तू खरंच ग्रेट आहेस मला समजून घेतलंस आणि आमच्या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार ही केलास☺️ आय लव यू शुभदे...खरंच मनापासून थँक्स☺️..  तुला नाही माहीत मला आज किती आनंद झाला आहे, आणि तू आज माझ्या मनावरचे ओझे किती कमी केलेस ते. असे म्हणत भावनाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भावनाने आपले मनोगत व्यक्त केल्यावर शुभदाने अग भावना हो.. हो.. किती वेळा आभार ह☺️... सगळं खरं आहे ग.. पण आई आणि बाबा आहेत की? त्यांना कोण आणि कसं सांगणार? त्यांचा पण होकार घ्यावा लागेल, आणि मला फक्त एकच अडचण वाटत आहे ती म्हणजे तू त्याच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहेस. असो त्याचा विचार आता नको करायला.. पण तुझं नक्की आहे ना भावना?.. आणि तू सागरशीच लग्न करणार आहेस ना?. आणि महत्वाचे म्हणजे तुझ्या आई बाबांचे काय? असे अनेक प्रश्नांची मालिका तिच्या समोर ठेवल्याने भावना भंडावून गेली होती. तिला काहीच सुचत न्हवते. किती मी आनंदात होते आणि हे काय शुभदे.. तूझ्या या प्रश्नांमुळे मी चक्रावून गेली आहे. जाऊ देत.. त्याचा आत्ताच नको विचार करायला. असे म्हणत भावना ने मनोगत व्यक्त केले. शुभदाने भावनाला.. काय ग भावना तू हे माझ्या शी तुम्हा दोघांबद्दल जे काही बोललीस ते सागरला माहीत आहे का ग? होय ग... मी तुझ्या शी आमच्या दोघांबद्दल बोलणार हे त्याला माहीत आहे, पण आज बोलणार होते हे त्याला नाही सांगितले. पण का ग? असं का विचारत आहेस तू? असे भावनाने तिला विचारले असता, अग काही नाही, नको घाबरुस जरा त्याची खेचायची असा विचार करतेय मी. अग आज दुपारी ना.. मला मार्केट ला सोडून लगेच येतो म्हणून जो गेला तो दोन तासानेच आला ग शहाणा, भर उन्हात मी आडोश्याला उभी होती. असा राग आला होता तुला काय सांगू? आता त्याला बघतेच मी. असे म्हणताच ए शुभदा.. नको ग.. त्याला असे सतावूस त्याला खूप टेन्शन येईल ग.. आणि आज दुपारी म्हणजे दर मंगळवारी आम्ही फोनवर भेटणार असे आमचे ठरले आहे आणि मी त्याची वाट पाहत होते ग.. मलाचं फोन करण्यासाठी त्याने हे केले होते ग.. प्लिज नको त्याला त्रास देऊस असे म्हणता ओह.. अरे बापरे आत्ता पासूनच त्याची बाजू घेतेस ह.. तू तर माझी मैत्रीण आहेस ना☺️ लगेच विसरलीस की काय☺️ असे हसतच तिने भावना ची मस्करी केली. नाही ग.. अस काही नाही.. तू आज ही माझी मैत्रीण आहेस आणि कायमच असणार. असे म्हणत दोघं ही मनापासून हसल्या. ऎक भावना.. आज मी सागरची खेचणार आहे, तुम्हा दोघांबद्दल कळले आहे आणि यावरून त्याची चांगलीच गंम्मत करणार आहे तू फक्त त्याला काही सांगू नकोस प्लिज ह.. आणि तुला माझी शपथ आहे. बर बाई हो.. नाही सांगत पण जास्त नको त्रास देऊस त्याला असे भावनाने तिला सांगितले. 


      पुन्हा एकदा भावनाने शुभदे थँक्स माझ्या आणि सागरच्या प्रेमाला तू मोकळ्या मनाने स्वीकारलेस आणि असेच आमच्या बाजूने शेवट पर्यंत रहा असे म्हणत आभार मानले. शुभदा ने पण अग तुला अस कस वाटले की मी तुला विरोध करेन. फक्त तुम्ही दोघे शेवटपर्यंत तुमच्या निर्णयावर ठाम रहा. असे म्हणत चल बाय.. आणि हो भावना तू मला सर्व सांगितलंस हे सागरला कळू देऊ नकोस म्हणताच, अग हो ग बाई.. नाही सांगत त्याला मी. आणि बाय म्हणत फोन ठेवले दोघींनी. फोन ठेवताच शुभदा तिच्या रूम वर जाऊन या दोघांबद्दल म्हणजेच त्यांच्या नात्याबद्दल विचार करू लागली होती. तिचे आई वडील हे नातं स्वीकारतील का?, सागर तिच्या सोबत असेल की त्याचे मत बदलेल. असे प्रश्न तिच्या मनात घोळत होते. पण सागरच्या आयुष्यात भावना आल्याने ती ही खुश होती. सागरची आजच मस्करी करायचे तिने ठरवले होते. सागर यायची वाट पाहत होती. बराच वेळ होऊन ही सागर आला नव्हता. संध्याकाळ होऊन गेली होती. रात्रीच्या जेवणाची वेळी सागर आला होता. हातपाय धुऊन सागर सगळ्यां सोबत जेवायला बसला होता. शुभदा ने सागरला जेवण झाल्यावर मला तुझ्या शी जरा मह्त्वाचे बोलायचे आहे टेरिस वर चल असे म्हणत ती टेरिस वर निघून गेली होती. ताई अशी काय बोलणार आहे, याच विचारात सागर टेरिसवर जाण्यास निघाला होता. टेरिसवर शुभदा त्याची वाटच पहात होती. सागर वर आलेला कळताच जरा मोठ्या आवाजात सागर इकडे ये लवकर असे शुभदा ओरडली असता सागर चांगलाच दचकला होता.

शुभदाच्या या कृतीने सागर चांगलाच घाबरला होता. सागरच्या मनात आमच्या दोघां बद्दल ताईला इतरांकडून कळले तर नसेल ना? या प्रश्नाने घर केले होते. आणि ही शंका खरी ठरली तर हे कसं सांभाळून घ्यायचे याचा विचार करत तो तिच्या समोर येऊन उभा राहिला होता. सागर समोर येताच प्रचंड राग चेहऱ्यावर आणून काय रे तू माझा भाऊ असून असा कसा वागलास रे?, मी जे काही ऐकले आहे ते नक्की खर आहे का?, मला लाज वाटतेय तुला भाऊ म्हणून घ्यायची असे रागमाळ वाहता सागर चांगलाच हबकला होता, पण हिला नक्की काय समजले आहे हे त्याला कळले नव्हते. सागरने एकदम दबक्या आवाजातच अ ताई... तुला काय झाले आहे रागवायला आणि असे तुला माझ्या बद्दल काय कळले आहे? ते तरी सांग ना.. काही चुकल आहे का माझं? असे म्हणताच, शहाण्या तू असा असशील मला वाटले पण नाही. आज पासून तू मला ताई पण म्हणू नकोस, आणि मी हे सगळं आई बाबांना आज सांगणार आहे, आता तेच ठरवतील तुझ्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो?. ए.. ए ताई.. अस नको ना बोलूस तुला इतका राग येण्या सारख मी काय केलं आहे ते तरी सांग ना? ग.. असे म्हणत सागर ने तिचा हात पकडत मार... मार मला हे घे.. माझा गाल तुझ्या समोर आहे, पण सांग ना ग ताई असे म्हणत तिच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. 


      शुभदा ला हसू येत होते त्याची मस्करी करताना , पण स्वतःच्या हसण्यावर ताबा ठेवत त्याची ती खेचत होती. सागर मला इतरांकडून कळले आहे की.. तुझं आणि... असे म्हणत मुद्दामहून जरा वेळ थांबत सागर ला अजून टेंशन दिले असता अग ताई.. सांग ना आता तरी असे म्हणता शुभदाने.. मला तुझ्या आणि भावनाबद्दल जे काही कळाले आहे ते कितपत खरं आहे? असे विचारले असता सागर चांगलाच दचकला होता, यावर कायं आणि कसे सांगावे या गोंधळात सागरने चाचपडत तुला हे कोणी सांगितले?, आणि अजुन काय कळले आहे? असे म्हणता शुभदा ने ही होय.. बरच काही कळाले आहे आणि ती माझी जिवलग मैत्रीण असताना तू असा कसा वागलास रे.. सांग ना हे सगळं खरंच आहे ना? आता मी आई ला सर्व सांगणार आहे असे म्हणत खाली आई कडे जाण्यास काही पाऊले पुढे टाकत जाण्याचे नाटक करू लागली. ताई आईला सांगण्यास निघाली हे बघताच ताई.. थांब ना.. अस नको करुस.. होय.. खर आहे हे.. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ग, ती तुला सांगणारच होती, पण मीच तिला आत्ताच नको सांगू असे म्हणालो होतो. होय मला मान्य आहे ती तुझी मैत्रीण आहे ग.. पण माझं तिच्यावर खरंच प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे, प्लिज ताई.. घे ना समजून... नाहीतर तू एक काम कर ना ताई तू.. तू की नाही..तिलाच फोन करून विचार, ती पण तुला हेच सांगेल. आमचं खरच मनापासून प्रेम आहे ग ताई असे म्हणत त्याने ताईची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. शुभदाला मात्र खूप मजा येत होती सागरची ही अवस्था पाहून. बराच वेळ सागरने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने सागर ला आपल्या हाताने उठवत 😊😊 हसत अरे वेड्या.. खरच वेडा आहेस तू, मला भावनाने सारकाही सांगितले आहे.. तुमच्या बद्दल, मी तुझी मस्करी केली रे जरा, मला आज दुपारी मार्केट मध्ये उन्हात उभे राहायला लागले ना तुझ्या मुळे, म्हणून तिला सांगूनच तुझी खेचली. डोळे पुसत सागर जरा तणावरहित झाला होता. आणि काय ग ताई .. ही असली मस्करी करतात का कोणी? असे म्हणत खरंच ताई तुला राग नाही ना आला आमचा, आम्हाला तुझा सपोर्ट आहे ना? ग ताई, तूच आता आमचा आधार आहेस, करशील ना मदत आम्हाला असे म्हणताच होय रे वेड्या.. नक्की करणार तू फक्त माझ्या भावनाला धोका नको देऊस.. बस बाकी काही नाही. असे म्हणत त्याच्या डोक्यात टपली मारत चल आता खाली असे म्हणत शुभदा उठली होती. ताई ने त्यांच्या दोघांच्या प्रेमाला होकार दिल्याने सागर खुश होता. ताई थँक्स तू आम्हाला समजून घेतलंस, तू खुप चांगली आहेस ग.. असे म्हणता हो का.. बस.. बस मस्का नको मारुस असे म्हणत दोघे ही खाली आले होते. 


सागर आणि शुभदा दोघे ही खाली आले होते. खाली येऊन हॉल मधल्या सोफ्यावर बसले. बाजूच्याच सोफ्यावर त्यांचे वडील बसले होते, दोघे ही सोफ्यावर बसताच काय रे काय काम होते, एवढं काय गुपित आहे कळू तर दे आम्हाला असे विचारता शुभदा ने ☺️ हसतच नजरेनेच सागरला काय रे... सांगू का? सगळं असे सागरला खुनावताच सागर काहीही न बोलता नको असे मान हलवतच मूक नकार देत गप्प बसला होता. शुभदा ने ही लगेचच काही नाही बाबा.. असं काही नाहीं, आम्ही सहजच वरती गेलो होतो असे सांगितले. काही वेळानंतर वडील बाहेर गेल्यानंतर सागर शुभदा जवळ जाऊन काय ग ताई..  बाबा.. वरती आले होते का? असे विचारले, शुभदा ने नाही रे.. माझं लक्ष होते नाही आले, आपली मस्करी केली असेल त्यांनी असे सांगितले असता सागरच्या मनावरचा ताण कमी झाला होता. सागरने इकडे तिकडे पाहत हळूच काय ग ताई.. होईल ना सारे मनासारखं? आई बाबांची हे कळल्यावर काय प्रतिक्रिया आणि निर्णय असणार आहे? काय माहीत असे म्हणता शुभदा ने☺️ हसत.. त्याचे आत्ताच कशाला टेन्शन घेत आहेस, जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू आपण. ए.. आज संध्याकाळी मी भावनाला फोन करणार आहे तू बोलणार आहेस का?, की तुझा काय निरोप असेल तर देईन तिला असे म्हणता, सागर काही नाही ग ताई असे म्हणाला. ओह मी विसरलीच की तुम्हाला खाजगी बोलायचे असेल नाही का?😊😊 असे हसत तिने सागर ची थट्टा केली. काय ग ताई... असं काही नाही म्हणत तिथून निघाला.


      सागरने आई ला हाक देत मी रानात निघालो आहे रानातून काही आणायचे आहे का? असे विचारले असता, हो हो.. थोडी फार भाजी आणि हिरव्या मिरच्या जरा जास्तच आण, खरडा करायचा आहे असे आईने सांगताच रानाकडे निघाला. रानातील सर्व कामे उरकून आईने सांगितल्यानुसार भाजीपाला आणि मिरच्या तोडून निवांत बसला होता. इकडे शुभदा ने भावनाला फोन केला असता भावना घरीच असल्याने फोन तिनेच उचलला अन हॅलो भावडे काय मग.. काय करतेस?.. मी ना☺️ मी मजेत.. आहे शुभदे तू सांग कशी आहेस? मी पण मजेत आहे. भावना आज मी की नाही... सागरची चांगलीच खेचली ग.. तुला काय सांगू☺️ काय त्याचा चेहरा झाला होता ग.. अगदी रडकुंडीला आला होता शेवटी रडलाच ग☺️.. खरंच तू बघायला हवे होते. ए काय ग शुभदे.. का त्याला तू रडवलेस?.. हो हो.. मॅडम काय हे प्रेम आहे ☺️☺️ असे म्हणत तिने तिची सुद्धा खेचली जरा... पण काहीही म्हण मला खूपच मजा आली. पण तो रडायला लागल्या वर मात्र मी त्याला सांगितले मला सर्व काही तूच सांगितले तेव्हा जरा त्याच्या जीवात जीव आला होता. मग जरा मोकळ्या मनाने बोलू लागला, भावना माझा भाऊ खरच तुझ्या वर मनापासून प्रेम करतोय ग, त्याला.. मी आहे तुझ्या पाठीशी पण तिची साथ तू मात्र सोडू नकोस असे ही सांगितले आहे. शुभदे... खरच तू खूपच चांगली आहेस ग आम्हाला समजून घेतलंस आणि तुझी साथ ही आहे. मी पण तुला शब्द देते की.. मी पण त्याला कधीच सोडणार नाही, शेवटपर्यंत मी त्यासोबत असेन, ट्रस्ट मी असे भावना म्हणाली. अग भावना होय ग.. मला माहीत आहे ग. आता फक्त ही दोन तीन वर्षे सांभाळून रहा, याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नकोस. हुशार आहेस म्हणून सांगतेय मी. होय शुभदे नको करुस काळजी मी याचा माझ्या अभ्यासावर परिणाम नाही होऊ देणार, आणि त्याला ही नाही दुखवणार असे भावना म्हणत तिने ही शुभदा ला शब्द दिला. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर काय मग मॅडम भावना.. आपल्या प्रियकराला काय निरोप वैगेरे द्यायचा आहे का?☺️☺️ असे हसतच विचारले असता भावनाने ही ☺️☺️ हसतच काही निरोप वैगेरे नाही ह.. मॅडम असे भावना म्हणाली.  आणि काय ग घरात कोणी नाही वाटतं म्हणूनच इतकी बिनधास्त बोलत आहेस, होय ना☺️. असे विचारता शुभदा ने ही ☺️ हसतच होय ग कोणीच नाही म्हणूनच तर एवढी बिनधास्त बोलली मी, असे म्हणत चल बाय ठेवते फोन आता काळजी घे म्हणत शुभदाने फोन ठेवला. फोन ठेवायला अन सागरची यायची वेळ एकच झाल्याने, अरे रे.. सागर हे बघ.. आत्ताच फोन ठेवला मी थोडक्यासाठी चुकामुक झाली. करायचा असेल तर कर फोन, घरात कोणीच नाही असे शुभदा म्हणताच, असू देत ☺️ असे ही आम्ही मंगळवारी दुपारी बोलणारच आहोत असे सागर म्हणत त्याने आणलेला भाजीपाला अन मिरच्या हॉल मध्ये ठेवत नेहमीच्या कट्टयावर मित्रांना भेटावयास गेला.

सागर त्यांच्या मित्रांसोबत कट्टयावर गप्पा मारत बसला होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर इतर मित्र निघून गेले होते, वैभव ही निघत असता सागरने त्याला अरे वैभ्या थांब की लगा काय घाई आहे का?.. बोलायचंय तूझ्याशी. अरे काय नाय रे सगळेच निघाले म्हणून मी पण निघालो होतो. बोल ना काय बोलायचे आहे. असे वैभव म्हणता, अरे भावनाने ताई ला सगळं आमच्या बद्दल सांगितले, आणि तुला माहितेय का?.. ताईला कळल्यावर ती माझ्यावर चांगलीच चिडली होती रे.. माझे तर धाबेच दणाणले होते, पण बराच वेळानंतर तिने मस्करी करतेय असे सांगितले तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला रे.. जोपर्यत तिने सांगितले नाही तोपर्यन्त माझी पार वाट लागली होती वैभ्या, पण नशीब ताईचा आम्हाला म्हणजेच आमच्या प्रेमाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि ती योग्य वेळी आई बाबांशी पण बोलणार आहे. खुप मोठे टेंशन कमी झाले आहे रे. सागरने इत्यंभूत म्हणजेच घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर, अरे सागर हे काय बोलतोयस.. ताईने तुमच्या प्रेमाला होकार दिला की रे, तिच्याच मैत्रिणी वर तुझे प्रेम असून ही तुझ्यावर चिडली नाही आणि सपोर्ट ही करतेय म्हणजे गड्या तुझं नशीब खरंच जोरावरच आहे की रे☺️☺️. आणि कॉलेज सुरू झाल्यावर ताईला भेटायला जाण्याच्या निमित्ताने तू तिला ही भेटू शकशील की, काय बरोबर ना सागऱ्या☺️, आयला होय की वैभ्या... हे तर माझ्या पण लक्षात आले नव्हते. पुढच्याच महिन्यात त्यांचे कॉलेज सुरू होत आहे, मग काय टेन्शनच नाही म्हणत दोघांनी ही एकमेकांना टाळी देत आनंद व्यक्त केला. आणि दोघे ही घरी जाण्यास निघाले.


     घरी जाता जाता सागर उद्याचा विचार करत होता, कारण ही तसे विशेषच होते, ते म्हणजे येणारा दिवस हा मंगळवार म्हणजेच एकमेकांशी फोन वरून बोलण्याचा, भेटण्याचा होता. उद्याची सगळी कामे काहीही करून सकाळीच उरकून दुपारची वेळ भावना करिता राखून ठेवायची असे मनाशीच ठरवले होते.  घरी पोहचता पोहचता जवळ जवळ रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. घरी पोहचताच हातपाय धुवून जेवावयास डायनिंग चेयर वर येऊन बसला होता, त्याच्या पाठोपाठ सगळेच आले आणि जेवणाची पंगत बसली. गप्पा टप्पांच्या ओघात कधी जेवण झाले कोणालाच कळले नव्हते. जेवण झाल्यावर सागर आणि शुभदा शतपावली घेऊन आपआपल्या रूम मध्ये निघून गेले होते. सागर सकाळी लवकर उठून रानातली कामे उरकण्या करिता निघाला. रानातील सर्व कामे त्याने उरकण्याचा सपाटा लावला होता, आणि त्याने तोडलेला सर्व भाजीपाला अन केळी बाजारात व्यापाराला देऊन पैसे घेऊन घरी परतला होता. पटापट अंघोळ उरकून आई ग... लवकर जेवण दे मला बाहेर जायचे आहे असे म्हणत हॉल मध्ये बसला. शुभदा हे सारकाही पाहत होती, आणि मुद्दाम त्याला चिडवत होती, काय रे सागर... ह ह.. कोणाला.. भेटायचे आहे का रे?, कोण आहे सांग तरी मला. तसे हलक्या आवाजात सागरने काय ग ताई.. गप्प बस ना... कळले तर गडबड होईल. ए.. प्लिज ताई बघ नाहीतर न जेवता जाईन ह.. मी. असे सागर म्हणताच ☺️☺️हसतच शुभदा गप्प बसली. इकडे भावना ही आज सागर फोनवर भेटणार या आनंदात होती. दुपारी मैत्रीण सायली कडे जायचे या उद्देशाने तिने घरातली सगळी कामे उरकली होती, आणि जरा नेहमीपेक्षा आधीच जेवण्याकरिता बसली होती. जेवता जेवता तिने आईला कल्पना दिली की ती सायली कडे जाणार आहे. इकडे सागर ने भरपेट जेवण करत मित्र पवनच्या टेलिफोन बुथ कडे रवाना झाला होता. यावेळी मात्र सागर वेळेच्या आधीच तिथे हजर होता, त्याचा मित्र पवन ला ही कल्पना होती की, आज सागर भावनांशी बोलावयास येणार आहे. त्याने तसे त्याकरिता वेळ राखून ही ठेवली होती.

 

Suchi sexhaina
Suchi sexhaina

Desi Adult Sex Stories,Telugu Sex Stories,Bangla Sex Stories,Hindi Sex Stories,English Sex Stories,Incest Sex Stories,Mobile Sex Stories,Desi Indian Sex Stories

No comments:

Post a Comment